फलज्योतिष

फलज्योतिषावर विश्वास ठेवणाऱ्या बहुतेकांना फलज्योतिषाची उत्पती किंवा त्यातून केलेली भाकिते कशाच्या आधारवर केली जातात याविषयी काहीच माहिती नसते. त्यांच्या स्वतःबाबत अगर त्यांच्या मित्रांबाबत केलेल्या भाकितांपैकी काही भाकिते खरी ठरल्याचा त्यांना अनुभव आलेला असतो. आणि तेवढ्यावरून त्यांचा फलज्योतिषावर विश्वास बसतो. जुन्या रूढी आणि समजुतींवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याची मनोवृत्ती हेही त्याचे आणखी एक कारण आहे. पण यातील नवल वाटण्याजोगी गोष्ट अशी की जी जोतिष्यांनी केलेली भकितं साफ चुकीची ठरली ती मात्र हे लोक पार विसरून जातात किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात.  चुकीच्या भाकितांचं समर्थन अनेक प्रकारांनी केलं जातं. या शास्त्राचं सखोल ज्ञान असलेले ज्योतिषी विरळाच असतात; साधारण ज्योतिषी सहजपणे चुका करू शकतात; शिवाय ज्योतिषींना दिलेली जन्मवेळ तरी अगदी अचुक असतेच असं नव्हे त्यामुळेही अंदाज चुकतात; ही काही ज्योतिषशास्त्राची चूक नव्हे; इत्यादी अनेक कारणं दिली जातात. भाकिते ज्यावर अवलंबून असतात ते असले मोघम घटक कोणीच दूर करू शकत नाही. त्यामुळे फलज्योतिषींच्या भाकितांचं मूल्यमापन करण अशक्य होवून बसतं.

गृहीत गोष्टी:  शकुन-अपशकुन, जमीनीखालील खनीज अगर पाणी आहे का ओळखणं, भाकीत करणं अशा अद्भूत शक्तींचं अस्तित्व मानणं हा मानवी मनाचा दुर्दैवी कमकुवतपणा आहे. त्याचे अर्थशून्य ठोकताळे बाजूला केले तर फलज्योतिष म्हणजे भविश्यात पतंग उडविण्या सारखं उरेल. त्यातील तत्त्वं पोरखेळ वाटावा एवढी सोपी आहेत: व्यक्तीचं स्वभाव, गुणावगुण आणि दैव त्याच्या जन्माच्या वेळी सूर्यमालेतील ग्रहांची राशीचक्रामधली स्थाने आणि त्यातून निर्माण होणाèया आकृतिबंधानुसार निश्चित केली जातात. ग्रहांमधे सूर्य आणि चंद्र या तारा आणि उपग्रहाचाही समावेश आहे. या सर्वांची स्थाने कुंडलीमधे दाखविलेली असतात. त्यावरून फलज्योतिषी त्या व्यक्तीचा (किंवा कंपनी इत्यादींचा) भविष्य काळातील जीवनक्रम काय असेल याचे भाकीत करतात, संभाव्य धोके, अडचणींची सूचना देवून योग्य निर्णय घेण्यास मदत करतात. हे ग्रहतारे-नक्षत्र आपल्यापासून किती दूर आहेत आणि ते आपल्यावर काही परिणाम करू शकणे अशक्य आहे हे काही लोक जाणतात. परंतु जगभरातील इतर लाखो-करोडो लोक आपले आरोग्याबाबतचे, व्यवसायातील, किंवा वैयक्तिक बाबीतील निर्णय फलज्योतिषी आणि माध्यामांतील राशीभविष्यावरील  लिखाणावरून घेतात.

मानवी जीवनांतील अनिश्चितता हे या अंधविश्वासाचं एक कारण आहे. एरवी संख्या शास्त्र आणि विज्ञान यांच्या कसोटीवर फलज्योतिष मुळीच टिकणार नाही. कुंडलीवरून भविष्य ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धतीमधे विवेकाला पटणार नाहीत अशा अनेक गोष्टी गृहीत धरल्या जातात. भ्रामक विज्ञानाच्या मदतीने फलज्योतिषी त्यांचं समर्थन करतात. त्या गोष्टी अशा:

१. सर्व ग्रहांमधून किरणोत्सर्ग होत असतो. ही किरणे पृथ्वीवर सर्व ठिकाणी एकाच वेळी पोचतात. त्यासाठी जिथे आवश्यक होईल तिथे ही किरणे पृथ्वीच्या घनद्रव्यातूनही पलिकडे जातात. राहू आणि केतू म्हणजे तर केवळ काल्पनिक बिंदू आहेत त्यांच्यातूनही ग्रहांसारखाच किरणोत्सर्ग होतो.

२. पृथ्वीवर पोचण्यापूर्वी या किरणांचं दहा घटकांमधे पृथःकरण होतं. प्रत्येक घटक कुंडलीतील वेगवेगळ्या घराचं वेगवेगळं फळ देत असतो.

३. ग्रहांच्या अनेक दृष्टी असतात. कुंडलीतील विशिष्ट घरांवर त्यांची विशिष्ट दृष्टी असते आणि त्यावरून माणसाचं भविष्य ठरतं. ही सर्व कामं करण्यासाठी ग्रहांना फलज्योतिषाच्या नियमांचं ज्ञान असतं आणि दैवी शक्तीही असते.

भविष्यकथनासाठी फलज्योतिषींना दैवी अनुग्रह हवा असतो त्यासाठी ते वैज्ञानिक जिज्ञासेला फाटा देतात. ते जितकी खरी भविष्ये सांगतात तेवढीच किंवा त्यापेक्षाही जास्त खोटी भविष्ये असतात. त्यामुळे सारासार विचार करणाèया माणसाला फलज्योतिष एक थोतांड वाटते.

फलज्योतिषाची घातकता: प्रथमतः फलज्योतिष हे ‘वैज्ञानिक मनोवृत्ती जोपासणं हे भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे या संविधानाच्या दिशादर्शक तत्त्वाच्या विरोधात जाणारे आहे. कारण फलज्योतिष आपल्याला पुन्हा गुहेत राहणाऱ्या आदिवासीच्या अवस्थेला नेवून पोचवणारा अंधश्रद्धांचा बोजा आहे. हिंदू शास्त्रांप्रमाणे कुंडली माणसाचं भविष्य ठरवते. दुसरं म्हणजे भन्नाट कल्पना करणारे वेदिक पंडित अस्तित्वातच नसलेल्या राहू आणि केतू या दोन ग्रहांना नवग्रहांमधे सामील करतात. असल्या कल्पना उराशी बाळगून हिंदू अहिंदू यांच्यामधे दूरी निर्माण करण्याची संविधानविरोधी कारवाई हे पंडित करीत असतात. अनेक अभ्यासातून असं दिसून आलेलं आहे की फलज्योतिषाला काडीचाही वैज्ञानिक आधार नाही. एवढेच नव्हे तर भविष्य वर्तविण्यासाठी वापरण्यात येणारी तंत्रेही अशीच निराधार आहेत.  अंनिसने तर ह्या भविष्यकथनाच्या उद्योगाला ग्राहक संरक्षण कायद्याच्या नियंत्रणात ठेवून ग्राहकांना चुकीचं भविष्य सांगणाèया ज्योतिष्याला कोर्टात खेचण्याची सोय करावी अशी मागणी केली आहे. आपले दावे सिद्ध करून दाखवा असे आव्हान देवून, लोकांचे उद्बोधन आणि प्रयोग अशा तीन तऱ्हेने अंनिस फलज्योतिषाला विरोध करते.

फलज्योतिषाला आव्हान: फलज्योतिषाच्या मूलभूत संकल्पना आणि धारणांना आणि त्यांच्या सहाय्याने भविष्य-कथन करण्याच्या त्यांच्या दाव्याला अंनिस आव्हान देते. कोणीही ज्योतिषी वैज्ञानिक कसोटीला खरे उतरले तर अंनिस त्यांना एक भल्या मोठ्या रक्कमेचे पारितोषिक देण्यास तयार आहे. ही रक्कम वेळोवेळी वाढविण्यात आली आणि त्याची भरपूर जाहिरातही करण्यात आली. परंतु आजपावेतो एकही ज्योतिषी हे आव्हान स्वीकारण्यास तयार झालेला नाही. लोक मात्र त्यामुळे फलज्योतिषाबद्दल शंका व्यक्त करू लागले.

उद्बोधन: ज्योतिष शास्त्रातील मूलभूत संकल्पना आणि धारणा यांना दिलेले आव्हान सैद्धांतिक स्वरूपाचे म्हणजे त्यांच्यातील अंतर्विरोध उघड करणे अशा स्वरूपाचे असते. सामान्य जनतेच्या उद्बोधनासाठी मोठमोठ्या ज्योतिष्यांनी केलेली भाकिते किती मोठ्या प्रमाणात चुकतात याची त्यांना चटकन पटतील अशी उदाहरणेच त्यांच्यापुढे मांडली जातात. लोक त्यातून योग्य तो निष्कर्ष काढतात.

प्रयोग: यामधे जन्मानंतर काही तासातच मृत पावलेल्या बाळाची पत्रिका एका फलज्योतिषीला दाखविण्यात आली. हे बाळ अल्पायुशी असण्याची शक्यता आहे का असं डॉक्टरांनी विचारल्यानंतरही त्या ज्योतिषीने ते बाळ आरोग्यसंपन्न आणि दीर्घायुशी आहे असे भाकीत वर्तविले! अगदी सामान्य माणूस सुद्धा यातून योग्य तोच धडा घेईल.

फलज्येतिष विरोधी मोहीम

चळवळीमधे विवेकवाद प्रथम मूर्त स्वरूपात आणण्याचं श्रेय डॉ. कोवूर  यांचं आहे. चमत्कार दाखवून बुवाबाजी करणाèया तथाकथित अलौकिक बाबाबुवांना आपला दावा सिद्ध करून दाखवा असं आव्हान त्यांनी दिलं. १९७२ साली त्यांनी आपला अलौकिकतेचा दावा सिद्ध करून दाखविणाèया व्यक्तीस एक लाख रुपयांचे पारितोषिकही जाहीर केले.

यातील अचुक भविष्यकथनाचा दावा करणार्यासाठीची कसोटी अशी: ज्योतिषींना दहा व्यक्तींच्या हस्तमुद्रा किंवा  कुंडल्या त्यांच्या जन्मस्थानाचे अचूक अक्षांश-रेखांश आणि अचुक जन्मवेळ यासकट दिल्या जातील. ज्योतिष्यांनी फक्त दोनच गोष्टी सांगायच्या-१. पत्रिकेतील व्यक्ती स्त्री आहे का पुरुष आणि २. ती व्यक्ती जीवंत आहे का नाही. त्यावेळी कोणीही हे आव्हान स्वीकारले नाही. असेच आव्हान अंनिसने पुढे जास्त आकर्षक बनविण्यासाठी एक लाखावरून एकवीस लाखापर्यंत वाढविले आणि माध्यमांद्वारे त्याची खूप जाहिरातही केली. आणि भाकित अचुक असण्याची अटही २० % नी कमी केली. पण आजही कोणीही एवढे सोपे आव्हान स्वीकारण्यास पुढे येत नाही! परंतु यातून निदान लोकांना तरी ज्योतिषशास्त्र किती भ्रामक आहे हे पटू लागलं आहे. उद्याचं जावू द्या; पण आज काय आहे हे सुद्धा ओळखता येवू नये? भारतातील एकाही ज्योतिषपंडिताला आजपर्यंत एकही अचुक भविष्य वर्तविता येवू नये? पैशासाठी नसले तरी निदान स्वतःची इज्जत राखण्यासाठी तरी? साध्या साध्या गोष्टी ओळखण्यासाठी फारसं गहन ज्ञान लागत नाही.

 हस्तसामुद्रिक, फलज्योतिषी आणि रोखेबाजारविश्लेषक यांचे स्फुट विचार:

१. रोखेबाजार विश्लेषक-भाकित वर्तवणं हा बुचकळ्यात टाकणारा व्यवसाय आहे. कैक वर्षे मी अशा भाकितांचा अभ्यास करीत आलो आहे; काही वर्षे स्वतःही भाकितं केली आहेत कारण मी इक्विटी रीसर्चर होतो. शेअर बाजारातील चढउतारांचा कंपन्यांच्या कामगिरीशी संदर्भ लावून बाजाराच्या परिस्थितीचा अंदाज घेत होतो. त्या काळच्या स्वतःच्याच लेखांकडे आता जेव्हा मी बघतो तेव्हा त्यामधे खऱ्या-खोट्या भविष्य कथनांचं एक कडबोळं मला दिसतं. माझ्या इतर व्यवसाय बंधूंबाबतही असंच चित्र आहे. खरं खोटं काहीही भाकीत करा, पण व्यवसाय चालूच राहतात. मोठ्यामोठ्या कंपन्यांमधे असे विश्लेशक लठ्ठ पगार देवून ठेवलेले असतात. गुंतवणूक दारांचे त्यांच्यामुळे खूप नुकसानही होते. पण त्यांना कधी कोणी बडतर्फ करीत नाही की कोर्टामधे खेचत नाही. त्यांच्या एम बी ए डिग्रीचा मान राखून या भाकितकारांना हस्तसामुद्रिक आणि फलज्योतिषी यांच्या पंक्तीला बसवायला हवं कारण त्यांच्यात फरक एवढाच असतो की रोखेबाजार विश्लेशकांना बहुराष्ट्रीय कंपन्या लठ्ठ पगार देत असतात आणि फलज्योतिषी आणि हस्तसामुद्रिक यांना असा पगार नसतो. पण भविष्य सांगणाऱ्या काही टीव्ही चॅनलमुळे आणि वर्तमानपत्रांमुळे खूप पसिद्ध झाले आहेत आणि चांगली कमाई पण करतात. मी आणि माझी पत्नी- आमची रास एकच आहे-आम्ही प्रत्येक महिन्याचं आणि सबंध वर्षाचं अगदी सविस्तर भविष्य सांगणारं साहित्य विकत घेत असू. ते अगदी काळजीपूर्वक वाचून मी आपल्या ‘पाम पायलटङ्क मधे त्याची नोंदही करूने ठेवीत असे. म्हणजे महिन्याच्या पहिल्या तारखेलाच संपूर्ण महिना कसा जाणार हे कळून येई. दिल्लीला दिल्या जाणाèया साèया मेजवान्यांमधे पनीर असेल की नाही हे जसं अचुक सांगता येईल तसंच आमच्या राशीभविष्याचंही विश्लेषण होतं.

आणि माझी खात्री आहे तुमचंही माझ्यापेक्षा काही वेगळं नसणार. सगळंच भविष्य कथन म्हणजे कचरा असतं असं मी म्हणणार नाही. पण हे काही प्रेशर कुकर किंवा रेफ्रिजरेटर यांच्यासारखं भरवश्याचं जे चालू केलं की हमखास अन्न शिजवेल किंवा थंड करेल असे उत्पादन किंवा सेवा नाही. भविष्य कथन एवढं विश्वास ठेवण्यालायक नसतं हे आपण सर्वच जाणतो. हे सर्व जाणूनही असलं खोट असलेलं उत्पादन मी का विकत घेत राहतो?

  1. डॉ. नारलीकरांचं मत:

फलज्योतिष्याला ते शहरी अंशश्रद्धा म्हणतात. अगदी तरूण माणसं सुद्धा त्यावर भरोसा ठेवतात याची त्यांना काळजी वाटते. त्यांच्या अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या ‘सायंटिफिक एज‘ या पुस्तकात वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला समाज निर्माण करण्याच्या संदर्भात ते म्हणतात, ‘फलज्योतिष्यावर असलेल्या श्रद्धेचं पुन्हा एकदा परीक्षण करायला हवं. केवळ वयस्क लोकच त्यावर विश्वास करतात असे नाही. खूपशा तरूण मुलांचीही फलज्योतिषावर श्रद्धा असते. मला असं वाटतं प्रत्येकाने ते व्यक्तिशः तपासावे आणि मगच विवेकपूर्ण निर्णय घ्यावा. डॉ.नरेन्द्र दधिच, आयुकाचे डायरेक्टर यांना दिलेल्या मुलाखतीमधे डॉ.नारलीकरांनी आपल्या या पुस्तकाबाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतांना गेल्या शतकातील भारतीय विज्ञानाच्या वाटचालीतील शिखरं तसेच खाचखळगे स्पष्ट केले.

वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्यासाठी समाजमनामधे परिवर्तन होण्याची किती गरज आहे हे सांगतांना त्यांनी राजा राममोहन रॉय यांनी ह्या बाबतीत बजावलेल्या कामगिरीवर प्रकाश टाकला आहे. सतीची चाल बंद करण्याचा कायदा मंजूर करून घेण्यात राजा राममोहन रॉय यांचा महत्वाचा वाटा होता. आधुनिक विज्ञान शिक्षणात आणण्याचा त्यांनी पाठपुरावा केला आणि समाजमानस बदल्याशिवाय प्रगती होवू शकणार नाही हे प्रथम त्यांना उमगले.

पुस्तकाच्या ‘विज्ञान आणि धर्म‘ या अखेरच्या प्रकरणावरील प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणतात, ‘ही दोन्ही स्वतंत्र क्षेत्रे आहेत आणि एकाचे दुसऱ्यांवर अतिक्रमण होता कामा नये; धर्माने जशी वैज्ञानिक तथ्ये स्वीकारायला हवीत तसेच विज्ञानानेही आपल्याला सर्वच गोष्टींचं आकलन होतं आणि स्पष्टीकरण करता येतं असं नाही हे मान्य करावं. उदा: विश्वाची उत्पत्ती कशी झाली हे अजूनही समजलेले नाही. विज्ञानाला हे एक मोठे आव्हान आहे. तेव्हा विज्ञानाने सुद्धा नम्र राहिलंच पाहिजे.

4.शैक्षणिक संस्थांमधे फलज्योतिष्याचे शिक्षण:

‘शैक्षणिक संस्थांमधून  फलज्योतिष शिकविण्याची कल्पना अत्यंत प्रतिगामी आहेङ्क असे सीताराम येचुरी ठासून सांगतात. आपण आपल्या श्रद्धांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि म्हणून फलज्योतिष शिकवलं गेलं पाहिजे असं मुरली मनोहर जोशी यांचं वक्तव्य त्यांना आठवलं. म्हणून (विचार न करता) विश्वास ठेवण्याने काय होते त्याचा एक किस्सा त्यांनी सांगितला. ‘नुकतेच चेन्नई इथे काही मंत्र्यांचं प्रतिनिधीमंडळ आलं होतं. त्याचं स्वागत चालू होतं. व्यासपीठावरच्या टेबलावर पाण्याचे पेले ठेवलेले होते. एका पेल्यात रंगीत पाणी होतं. तो प्याला फुलदाणी म्हणून वापरला जात होता. त्यातील जुनी फुलं काढून टाकून नवी आणायसाठी माळी बागेत गेलेला होता. मंत्रीसाहेबांना मोठा विश्वास की आपल्यासाठीच हे रंगीत पेय ठेवले असणार; त्यांनी ते पिवून टाकले; आणि पुढचे तीन दिवस इस्पितळात उपचार घेत राहिले.

‘शासनाच्या ऐतिहासिक नोंदी बदलून टाकण्याचा उद्योग सुद्धा फार चिंताजनक आहे. हिंदूधर्म हा शुद्ध आणि एतद्देशीय धर्म आहे हे सिद्ध करण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षांना आर्य लोकही एतद्देशीयच आहेत हे सिद्ध करावे लागते. मग मोहेंजोदारो आणि हरप्पा येथील सभ्यता आणि संस्कृतीही आर्यांचीच होती हेही सिद्ध करावे लागते. आर्यांचं एक लक्षण म्हणजे घोडे जे त्यांना लढाईसाठी आणि प्रवासासाठी लागत. त्यांच्यापैकी एकाला तेथील उत्खननात एक घोड्याचे हाड सापडले. म्हणाजे तेथील प्राचीन वसाहत आर्यांचीच! म्हणजे आर्य एतद्देशीयच! पण! त्या हाडाचं विश्लेषण केल्यावर कळलं की घोडा केवळ २०० च वर्षांपूर्वीचा होता.

‘भाजपने निवडलेल्या इतिहासकारांचा आणखी एक मूर्खपणा. उत्खननाच्या जागी एक बैलासारखा दिसणाऱ्या  जनावराचा पुतळा सापडला. त्याला लांब केस आणि आयाळ दखविली होती. त्याची आकृती त्यांनी अनेक काँप्यूटरमधे फीड केली. एका काँप्यूटर नुसार त्याचं घोड्याशी साम्य दिसलं. मग तो घोड्याचाच पुतळा; म्हणजे आर्य संस्कृतीचाच आणि आर्य एतद्देशीयच! आता पहा तुम्ही बैलाला घोडा म्हणालात आणि बैलाचा पुतळा घोड्याचा आहे असं पटवून देवू लागलात तर तुमच्या धारणा आणि तुमचे सिद्धान्त यांच्याविषयी काय समजायचं?

येचुरी प्राध्यापक असतानाची एक गोष्ट सांगतात. एका प्राध्यापकाने आपल्या बागेमधे एक दहा फूट खोल खड्डा खणला. तिथे त्यांना एक तारेचा तुकडा सापडला. त्यांनी धावतपळत कॉलेज गाठलं आणि म्हणाले, ‘हे पहा, मला काय सापडलंय! यावरून आमचे पूर्वज किती प्रगत होते; ते टेलिफोन वापरीत होते हे सिद्ध होतं. ‘वा फारच छान.ङ्क असं म्हणून दुसरा सह्कारी त्याच जागी आणखी बरंच खोल खणतो, पण त्याला काहीच सापडत नाही. तेव्हा तो म्हणतो, ‘पहा एवढं खणून सुद्धा मला काहीच सापडलं नाही याचा अर्थ आपले त्याही अगोदरचे पूर्वज आणखीनच प्रगत असले पाहिजेत. ते वायरलेस वापरीत!

खरं हिंदुत्व कसं मोजायचं यावर येचुरी म्हणतात, ‘त्यांच्या आंध्रप्रदेशामधे काही काही भागांमधे मुलीचं वयात आल्याबरोबर तिच्या मामाशी लग्न लावण्याचा सर्रास प्रघात आहे. उत्तर हिंदुस्थानात ही प्रथा अगदीच वाईट मानतात. आणि असं कोणी लग्न केल्यास त्याला लोक मारून टाकतील। आता इथे प्रश्न उभा राहतो यांच्यापैकी खरा हिंदू कोण? ही प्रथा पाळणारे आंध्रपदेशातील लोक का ह्या प्रथेला घृणास्पद मानणारे उत्तर हिंदुस्थानी ?

‘हिंदुत्व मोजण्यातील वेडेपणाचं आणखी एक उदाहरण. केरळमधे ओनमचा सण साजरा करतात. लोकांच्या हिताचं रक्षण करणारा राजा महाबळी या वर्षी प्रजेला भेटण्यासाठी येतो असं तिथे लोक मानतात. उत्तर भारतात महाबळी एक दुष्ट राक्षस समजला जातो, त्याला मारून विष्णूने सर्व देवांची सुटका केली आणि जगाला वाचवलं असं मानतात. आता यांच्यापैकी खरे हिंदू कोण?

रामभक्तांनी कृष्णभक्तांना कृष्णाची भक्ती करू नका असं सांगायचं आणि कृष्णभक्तांनी याच्या उलट. थोडक्यात काय देवसुद्धा कोणाची भक्ती करावी हे सांगू शकत नाही.निेरीश्वरवाद  ही सुद्धा कोणत्याच देवाची भक्ती न करणारी कोणालाच देव न मानणारी एक श्रद्धाच आहे. आणि धर्माच्या बाबतीत जर देवालाच काही अधिकार नाही तर या भाजप वाल्यांना हा अधिकार कोणी दिला? आणि पौरोहित्य  हा विषय पदवीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करून हे लोक विद्याथ्र्यांना थेट मध्ययुगात नेवून पोहचवतील. त्यातून निरर्थक, काहीही वैज्ञानिक अगर नैतिक आधार नसलेल्या, कालबाह्य कर्मकाण्डांना पुन्हा प्रचारात आणतील.

सीताराम येचुरी भारतीय  कम्युनिस्ट (माक्र्सिस्ट)  पक्षाच्या पॉलिटब्यूरोचे सदस्य आहेत.

महा अंनिसने योजलेले उपाय: यूजीसी या संस्थेने सर्व विश्वविद्यालयांना पदवीपूर्व, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट पातळीवरील सर्व अभ्यासक्रमांमधे फलज्योतिष हा विषय समाविष्ट करण्याविषयी लिहिले आहे. या शंकास्पद शास्त्राला मान्यता प्राप्त करून देण्याच्या ह्या शासनाच्या  भगव्या खेळीला अंनिसने जोरदार विरोध केला आहे. महाराष्ट्रातील विश्वविद्यालयांशी संपर्क साधून हा विषय पक्षपात करणारा आणि अधोगतीला नेणारा असल्याने अभ्यासक्रमात समाविष्ट न करण्याचे सुचविले. फलज्योतिष आणि असल्याच इतर बेगडी शांस्त्रांचं आणि शास्त्रींचं  ढोंग लवकरात लवकर उघडं करणं भाग आहे. सर्व कुलगुरूंनी आमच्या विनंतीला मान दिला आणि असले कोणतेही प्रतिगामी अभ्यासक्रम आपल्या विश्वविद्यालयांमधे येवू न देण्याचा निर्धार केला. औरंगाबादच्या अंनिसच्या कार्यकत्र्यांनी तर कोर्टाने यूजीसीला हा अभ्यासक्रम कोणत्याही शैक्षणिक संस्थेमधे सुरू केला जावू नये अशी सूचना देण्यासाठी केस दाखल केली आहे.

फलज्योतिष अभ्यासविषय म्हणून समाविष्ट होता कामानये यासाठी अंनिसने ठिकठिकाणी व्याख्याने आयोजित केली. आपल्याकडे माहिती तंत्रविज्ञानाच्या क्षेत्रामधे कित्येक कुशल कर्मचारी असताना आपण या कुचकामी तथाकथित शास्त्राचा पाठपुरावा का करावा? फलज्योतिषाची वाखाणणी का करावी? फलज्योतिष, गूढवाद, अध्यात्मिकता आणि इतर सोंगढोंगांची भूमी अशी आपली प्रतिमा भारताबाहेरच्या जगात झालेली आहे. अशी प्रतिमा धुवून काढण्यासाठी अंनिस फलज्योतिषाच्या खंद्या पुरस्कत्र्यांना सार्वजनिक वादविवादासाठी बोलावीत असते. असे अनेक वादविवाद ठिकठिकाणी झाले आहेत. अशा वादविवादातून श्रोत्यांचे प्रबोधन होवून त्यांना फलज्येतिष्यातील निरर्थकपणा ध्यानात येतो.

अंनिसने काही ठिकाणी या विशयावर बैठकी आणि परिशदा आयोजित केल्या आहेत. त्यामधे खालील प्रस्ताव एकमताने मान्य करण्यात आले.

१.  महाविद्यालये व विश्वविद्यालयांमधून फलज्योतिष हा विषय अभ्यासिला जावू नये.

२. फलज्योतिषावर विश्वास ठेवून अनेकदा नुकसान होत असल्याने ग्राहकसंरक्षण कायदा फलज्योतिषींना लागू करावा.

३. वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून फलज्योतिषावरील स्तंभाच्या खाली ‘केवळ करमणुकीसाठी अशी टिप्पणी छापणे अनिवार्य करावे.

४. लग्न जुळवतांना वधुवरांच्या पत्रिका पाहिल्या जावू नयेत.

५. दैववादाचे समूळ उच्चाटन करणे आवश्यक आहे.

सोलापूर येथे अखिल भारतीय फलज्योतिषी संमेलन भरले होते. यूजीसीने फलज्योतिष हा विषय समाविष्ट करावा असे सुचविल्यामुळे आपला झालेला विजय साजरा करण्यासाठी हा मेळा भरविला होता. अंनिसने ह्या मेळ्याचा उपयोग ह्या भ्रामक शास्त्राचे पितळ उघडे करण्यासाठी केला. अनेक प्रतिथयश फलज्योतिषींना त्यांनी कमीत कमी आपल्या आधारतत्त्वांचे तरी पुरावे सादर करावेत अशी विनंती करणारी पत्रे अंनिसने लिहिली. आपले वादमुद्दे मांडण्यासाठी कोणी फलज्योतिषी पुढे येत नाहीत असा आतापर्यंतचा अनुभव आहे. कदाचित यावर वाद होवूच शकत नाही असा त्यांचा समज असावा. फलज्योतिषींचे अंदाज सपशेल चुकल्यामुळे ओढवलेल्या आपत्तींबाबत लोकांना सांगण्यासाठी आम्ही एक स्पर्धा ठेवली होती. इतर देशांमधे असली भाकिते करणाऱ्याविरुद्ध काहीतरी कडक कारवाई झाली असती.

विद्याथ्र्यांनी असल्या लोकहितविरोधी कारवायाना विरोध करण्याची आणि फलज्योतिष आणि पत्रिका यांच्यावर विश्वास न ठेवण्याची शपथ घेण्यासाठी  ठिकठिकाणी शपथसमारंभ अंनिसने आयोजित केले. यामुळे दैव, यदृच्छा, किंवा योगायोग असल्या भ्रामक गोष्टींवर विश्वास न ठेवता मेहनत करण्याचे महत्त्व विद्याथ्र्यांना पटेल अशी अपेक्षा होती. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्यक्तींना पुढे येवून या भ्रामक शास्त्रांविरुद्ध त्यांनी ठोस भूमिका घ्यावी अशी त्यांना अंनिसने विनंती केली आहे. आपल्या महत्त्वाच्या मानवी मूल्यांच्या विरोधात उभे ठाकलेल्या या भ्रामक शास्त्राचा निशेध एका संयुक्त विधानाद्वारे अंनिस आणि सुप्रसिद्ध व्यक्तींनी मिळून करायला हवा.