भानामती

भुतांव्यतिरिक्त आणखीही काही कमी ताकतीच्या पण दुष्ट अलौकिक शक्तींचं अस्तित्व इथे मानण्यात येतं. त्यांचा उपयोग लग्न मोडणं, व्यापार-व्यवसायामधे विघ्न आणणं, निष्पाप जीवांचं मरणं, स्त्रियांना वष करून त्यांच्याकडून विशिष्ट दिवशी अगर वेळी दुष्कृत्य करवणं अशा गोष्टी करण्याची विद्या किंवा शक्ती काही तांत्रिकांना असते असा समज आहे.

वैज्ञानिक युक्तिवाद:

वैज्ञानिक संशोधनातून असं निष्पन्न निघालं आहे की गूढविद्या किंवा जादूटोण्याचं ज्ञान असं काही अस्तित्वात नाही. या सर्व मनाच्या कल्पना आहेत. आणि भोळ्या भाबड्या निष्पाप माणसांना फसवून लुबाडण्यासाठी त्या लोकांच्या मनामधे ठसविल्या जातात. भुताने झपाटण्यासारख्या गोष्टी योग्य युक्तिवादाने किंवा झपाटले असल्याचा आव आणणाया व्यक्तीच्या जबानीतून उघड करता येतात. अशा अनेक घटनांच्या अभ्यासातून हे स्पष्ट झालं आहे की झपाटलेली व्यक्ती मनोरुग्ण असते नाहीतर झपाटलं गेल्याचं ढोंग करीत असते. काही वेळा तर नुसता भास झाल्यानेही लोक फसतात.

याबाबतीतील अंनिसचे प्रयत्न: भुताने झपाटणं, अंगात येणं अशा मनोविकारावर अंनिसतर्फे बरेच साहित्य प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. त्यासाठी अंनिस जादुटोण्याबाबत जनजगृती करण्याचे अनेक कार्यक्रम  सतत पार पाडीत असते. अंनिसने शासनाकडेही असल्या मानसिक आजारांवर इलाज करण्यासाठी व संशोधन करण्यासाठी सुविधा मिळाव्या अशी मागणी केली आहे. गेली आठ वर्षे अंनिसने महाराष्ट्र शासनाने अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा करावा म्हणून तगादा लावला आहे. या कायद्याचा मसूदा महाराष्ट्र शासनाने अंनिस आणि डॉ. सत्यरंजन साठे, अॅड्वोकेट पी.बी. सावंत यांच्यासारख्या कायदेतज्ञाच्या मदतीने तयार केला. परंतु हा कायदा अजून विधानसभेने मजूर केलेला नाही.

जादुटोणा, गुप्तविद्या, वाईट नजर लागणे, शाप, भुतं आणि मृतात्मे या सर्व  गोष्टी म्हणजे द्वेश करणाया आणि विध्वंसक व्यक्तींनी उर्जा  आणि कुवत यांचा कुकर्मासाठी केलेला वापर. दुसयाला छळणं, नुकसान करणं, आणि त्याला आपल्य कह्यात ठेवून त्याच्याकडून विध्वंसक कृत्य घडवून आणणं हे या गोष्टी करण्यामागचं उद्दिष्ट असतं. लोकांचा असाही समज आहे की यामधे अलौकिक दैवी शक्ती दुष्कृत्यांसाठी वापरल्या जातात. दुसऱ्यांचा द्वेश करणाऱ्या माणसांची नजर वाईट असते आणि अशी नजर लागल्याने पीडित व्यक्तीचं नुकसान होतं, वाईट होतं. भुतं आणि मृतात्मे हे भटकणारे आत्मे असतात असंही लोक मानतात.

ज्याचा सूड घ्यायचा आहे ती व्यक्ती कितीही दूर असली तरी जादुटोण्याने तिला इजा पोचवता येते असाही समज आहे. एकूणच मत्सर, निराशा, हाव, स्वार्थ, असहिष्णुता, इतरांच्या सुखसमृद्धीचा द्वेश हा सर्व मनातील उद्रेक जादुटोण्याच्या सहाय्याने शमविता येतो आणि त्यातून एक विकृत आनंद मिळवता येतो. जगभर या गोष्टी खूप वाढत चालल्या आहेत आणि आपलीच माणसं आपलं अहित करीत आहेत हे लोकांच्या लक्षातही येत नाही. जादुटोण्याने अनेक कुटुंबे रसातळाला गेली आहेत असं मानणारेही लोक अगणित आहेत.

या वर उल्लेखिलेल्या अंधश्रद्धांमुळे आणखी एक दुष्ट प्रथा समाजात रुढ झाली आहे. अशा अशारीरिक आजाराने ग्रस्त रुग्णांना मानसोपचाराचे इलाज न करता कोणा भगत वगैरेकडे गुपचुप नेले जाते. तिथे त्या रुग्णाला भयानक विभ्रम उत्पन्न करणारी आणि स्थानिक प्राणी-वनस्पतीपासून बनविलेली विषारी द्रव्यं दिली जातात. त्यामुळे रुग्णाच्या शारीरिक व मानसिक यातना आणखीनच वाढतात. आणि त्याच्या मनातील जादुटोण्याबाबतचा भयगंड आणखी वाढतो.