जादूटोणा: बुवा-बाजी भांडाफोड

जादूटोणा ही कल्पना अतिप्रचीन आहे. आपल्या वेदांमधे, विशेषतः यजुर्वेदामधे जादुटोण्याचे वर्णन आहे. जादुटोण्यासारख्या अलौकिक शक्तीचं अस्तित्व मानणं हीच मुळात एक अंधश्रद्धा आहे. भुताने अगर एखाद्या दैवी शक्तीने पछाडलेल्या लोकांवर झालेल्या परिणामाचा निरास करण्यासाठी जादुटोण्यातील मंत्रतंत्रांचा वापर मांत्रिकांद्वारे करण्यात येत असतो. काही तांत्रिकांच्यामधे अलौकिक शक्ती असते आणि त्या शक्तीच्या सहाय्याने ते लोकांचे वर्तन नियंत्रित करू शकतात असा समज असतो. पण मुळात भूत किंवा देवदेवता आणि त्यांची अलौकिक शक्ती ह्यांचंच अस्तित्व सिद्ध झालेलं नसतांना त्यांनी कोणाही माणसाला पछाडणं कसं शक्य आहे?

भूत-खेतांचे प्रकार:

 भुताखेतांचे अनेक प्रकार असतात असा महाराष्ट्रामधे समज आहे. भुते वेगवेगळ्या नावाने ओळखली जातात. लोभी  ब्राह्मण मेल्यावर ब्रह्मसमंध होतो; प्रसूतीवेळी मरण पावलेली स्त्री हडळ होते; कर्णपिशाच्च नावाचे भूत दिसत नाही पण ऐकू येते. ही पिशाच्चे वस्तूंना जागेवरून हलवतात, कपडे फाडतात किंवा पेटवतात; कपड्यांवर अगर भिंतीवर घाणेरडे डाग पाडतात; अन्न पाण्यासारखं पातळ बनवतात; घाणेरडं करतात असा समज आहे. घरामधे अशा गोष्टी कोणत्या तरी अलौकिक शक्तीच्या प्रभावाने होत असतात आणि त्यांचा बंदोबस्त केवल मांत्रिकच करू शकतात अशी अनेकांची ठाम असजूत असते. स्वयंनियुक्त मांत्रिक असा आव आणतात की याबाबतीत तेच सगळं काही जाणतात आणि या पिशाच्च्याला कसं वठणीवर आणायचं हे त्यांच्या खेरीज इतर कोणालाही समजत नाही. त्यांच्यातील भटकणाèया आत्म्यांना तांत्रिक मुक्ती मिळवून देतात आणि मग त्या झपाटलेल्या माणसाची सुटका होते.

करणी आणि वशीकरण:

 भुतांव्यतिरिक्त आणखीही काही कमी ताकतीच्या पण दुष्ट अलौकिक शक्तींचं अस्तित्व इथे मानण्यात येतं. त्यांचा उपयोग लग्न मोडणं, व्यापार-व्यवसायामधे विघ्न आणणं, निष्पाप जीवांचं मरणं, स्त्रियांना वष करून त्यांच्याकडून विशिष्ट दिवशी अगर वेळी दुष्कृत्य करवणं अशा गोष्टी करण्याची विद्या किंवा शक्ती काही तांत्रिकांना असते असा समज आहे.

वैज्ञानिक युक्तिवाद:

वैज्ञानिक संशोधनातून असं निष्पन्न निघालं आहे की गूढविद्या किंवा जादूटोण्याचं ज्ञान असं काही अस्तित्वात नाही. या सर्व मनाच्या कल्पना आहेत. आणि भोळ्या भाबड्या निष्पाप माणसांना फसवून लुबाडण्या साठी त्या लोकांच्या मनामधे ठसविल्या जातात. भुताने झपाटण्यासारख्या गोष्टी योग्य युक्तिवादाने किंवा झपाटले असल्याचा आव आणणाऱ्या व्यक्तीच्या जबानीतून उघड करता येतात. अशा अनेक घटनांच्या अभ्यासातून हे स्पष्ट झालं आहे की झपाटलेली व्यक्ती मनोरुग्ण असते नाहीतर झपाटलं गेल्याचं ढोंग करीत असते. काही वेळा तर नुसता भास झाल्यानेही लोक फसतात.

याबाबतीतील अंनिसचे प्रयत्न: भुताने झपाटणं, अंगात येणं अशा मनोविकारावर अंनिसतर्फे बरेच साहित्य प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. त्यासाठी अंनिस जादुटोण्याबाबत जनजगृती करण्याचे अनेक कार्यक्रम  सतत पार पाडीत असते. अंनिसने शासनाकडेही असल्या मानसिक आजारांवर इलाज करण्यासाठी व संशोधन करण्यासाठी सुविधा मिळाव्या अशी मागणी केली आहे. गेली आठ वर्षे अंनिसने महाराष्ट्र शासनाने अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा करावा म्हणून तगादा लावला आहे. या कायद्याचा मसूदा महाराष्ट्र शासनाने अंनिस आणि डॉ. सत्यरंजन साठे, अॅड्वोकेट पी.बी. सावंत यांच्यासारख्या कायदेतज्ञाच्या मदतीने तयार केला. परंतु हा कायदा अजून विधानसभेने मजूर केलेला नाही.

जादुटोणा, गुप्तविद्या, वाईट नजर लागणे, शाप, भुतं आणि मृतात्मे

या सर्व  गोष्टी म्हणजे द्वेश करणाऱ्या आणि विध्वंसक व्यक्तींनी उर्जा  आणि कुवत यांचा कुकर्मासाठी केलेला वापर. दुसऱ्याला  छळणं, नुकसान करणं, आणि त्याला आपल्य कह्यात ठेवून त्याच्याकडून विध्वंसक कृत्य घडवून आणणं हे या गोष्टी करण्यामागचं उद्दिष्ट असतं. लोकांचा असाही समज आहे की यामधे अलौकिक दैवी शक्ती दुष्कृत्यांसाठी वापरल्या जातात. दुसèयांचा द्वेश करणाऱ्या माणसांची नजर वाईट असते आणि अशी नजर लागल्याने पीडित व्यक्तीचं नुकसान होतं, वाईट होतं. भुतं आणि मृतात्मे हे भटकणारे आत्मे असतात असंही लोक मानतात.

ज्याचा सूड घ्यायचा आहे ती व्यक्ती कितीही दूर असली तरी जादुटोण्याने तिला इजा पोचवता येते असाही समज आहे. एकूणच मत्सर, निराशा, हाव, स्वार्थ, असहिष्णुता, इतरांच्या सुखसमृद्धीचा द्वेश हा सर्व मनातील उद्रेक जादुटोण्याच्या सहाय्याने शमविता येतो आणि त्यातून एक विकृत आनंद मिळवता येतो. जगभर या गोष्टी खूप वाढत चालल्या आहेत आणि आपलीच माणसं आपलं अहित करीत आहेत हे लोकांच्या लक्षातही येत नाही. जादुटोण्याने अनेक कुटुंबे रसातळाला गेली आहेत असं मानणारेही लोक अगणित आहेत.

या वर उल्लेखिलेल्या अंधश्रद्धांमुळे आणखी एक दुष्ट प्रथा समाजात रुढ झाली आहे. अशा अशारीरिक आजाराने ग्रस्त रुग्णांना मानसोपचाराचे इलाज न करता कोणा भगत वगैरेकडे गुपचुप नेले जाते. तिथे त्या रुग्णाला भयानक विभ्रम उत्पन्न करणारी आणि स्थानिक प्राणी-वनस्पतीपासून बनविलेली विषारी द्रव्यं दिली जातात. त्यामुळे रुग्णाच्या शारीरिक व मानसिक यातना आणखीनच वाढतात. आणि त्याच्या मनातील जादुटोण्याबाबतचा भयगंड आणखी वाढतो.

कायदा त्वरित करण्याची गरज:

 अंनिसच्या एका अलिकडच्या वार्तापत्राच्या अंकामधे हल्ली होत असलेला अंधश्रद्धांच्या वाढत्या प्रसारावर चार लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यामधे वर्णन केलेल्या, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागांमधे फोफावत असलेल्या या अंधस्रद्धांच्या घटना ‘जादुटोणा आणि तत्सम अघोरी इलाज आणि प्रथाङ्क यांच्याविरुद्ध त्वरित कायदा करण्याची किती गरज आहे हे स्पष्ट करतात. त्या घटना बघू या.

एका शिक्षकाची गोष्ट :

रायभान टेंभुर्णे हे या शिक्षकाचं नाव. टेंभुर्णे हे भंडारा जिल्ह्यातलं एक गाव आहे. रायभानला तीन मुली होत्या-थोरली रत्ना २० वर्षाची, कॉलेजमधे; सोळा वर्षाची अमिता बारावीत आणि तेरा वर्षाची सीमा हायस्कूलमधे शिकत होती. तसं हे कुटुंब सुखी होतं. खेड्यातल्या लोकांशी रायभानचं सूत जमलं होतं. परंतु त्याला काही मानसिक व्यथा होत्या  आणि त्यासाठी नागपूरला इलाज चालू होता. त्याच्या एका मित्राने त्याला सुचविले की त्याने नंदिनीला-एका मांत्रिक स्त्रीला-भेटावे. नंदिनी वारंवार होणारी दुखणी, कावीळ, चेटूक आणि भूतबाधा यावर इलाज करण्याबाबत प्रसिद्ध होती. तिला दैवी शक्ती मिळाली होती असा सर्वांचा समज होता. तिच्या इलाजाने रायभानही प्रभावित झाला. तो सत्ययुग या पंथाचा कट्टर अनुयायी होता. (हा पंथ विश्वकल्याणासाठी झटत असतो.) त्याने नंदिनीला त्याच्यासोबत सत्ययुग पंथामधे येण्याची विनंती केली. नंदिनीही आपल्या नवèयाला सोडून रायभानबरोबर त्याची दुसरी पत्नी होवून गेली. तिने रायभानच्या कुटुंबियांना आणि खेड्यातल्या सर्व लोकांना आपल्या अंगात येणाèया देवीच्या धाकाखाली ठेवलं. सारे तिला माताजी म्हणू लागले. घरातील लोकांवर तर तिने आपल्या वागण्या-बोलण्याने जादूच केली होती. धाकट्या मुलीने शाळा सोडून दिली. घरामधे कोणी आजारी पडलं तरी माताजी योग्य औषधोपचार होवू देत नसे. आजार ही ‘बाहेरची बाधा‘ असते आणि त्यातून रुग्णाची सुटका करण्याची दैवीशक्ती केवळ तिलाच प्राप्त झाली आहे असा तिचा दावा होता.

पण एकदा मोठी मुलगी रत्ना आजारी पडली. माताजींनी आपल्या दैवी शक्तीचे इलाज सुरू केले. पण रात्री रत्नाचा मृत्यू झाला. जवळच्याच एका प्लॉटमधे रायभानने रत्नाचा देह त्या प्लॉटच्या मालकाच्या विरोधाला न जुमानता पुरला. रत्नाच्या मृत्यूची बातमी आणि त्यासोबत अफवा गावभर पसरल्या. मुलीचा बळी देवून नंदिनी पुत्रप्राप्ती करून देईल या आशेने रायभानने आपल्या मुलीला मारून टाकले असा लोकांचा समज झाला.संतप्त झालेल्या लोकांना रायभानच्या संपूर्ण कुटुंबालाच देहदण्ड द्यायचा होता. पोलिसांनी मध्यस्थी करून लोकांना आवरले. लोकांनी तगादा लावल्याने शवविच्छेदनासाठी मृतदेह दवाखान्यात नेण्यात आला. लोकांनी जिथे रत्नाला पुरले होते त्या जागी नारळ, फुले, फळे एत्यादी वस्तू उत्स्फूर्तपणे आणून ठेवल्या. पोलिसांनी वेळीच केलेल्या मदतीमुळे साèया कुटुंबाची हत्त्या टळली. पुढे सर्व कुटुंबियांना अटक करून कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

अशा घटना सर्रास घडतच असतात. आणि गुन्हेगार मोकाट हिंडत असतात. या घटनेतील गुन्हेगार सुद्धा कायद्यातील पळवाटांमुळे शिक्षा न भोगता सुटतीलही!

 

सुफी  सिकंदर शहा :

 महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागातील जालना जिल्हा मागासलेला आहे. तेथे शिक्षण नाही, इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा नाहीत. ह्यामुळेही कदाचित तिथे बाबाबुवा, महाराज, देव्या यांचं पीक आलेलं असतं. अगदी उघडं तर कधी छुपं. त्यांच्यापैकीच एक सुफी सिकंदर शहा जे स्थानिक वृत्तपत्रामधे आपली जाहिरात करीत असंत. जाहिरातीचा सारांश असा: सुफी बाबा त्यांच्याकडे जाणाèया ‘भक्ताचंङ्क नशीब बदलून देतात. ह्याचा २२ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. व्यवसायातील तोटा, लग्नातील विघ्न, कौटुंबिक समस्या, मूलबाळ नसणं, भूतबाधा, जुनाट व्याधी, व्यसनमुक्ती, जोम इत्यादींच्या बाबतीत ७६ तासात त्यांच्या आशिर्वादाचं फळ दिसू लागतं. त्यांनी मंतरलेला ताईत बांधा; तुमच्या समस्या ताबडतोब दूर होतील. आपल्या ४-५ अनुयायांसोबत एका हॉटेलमधे राहून ते आपला धंदा तेजीत चालवीत. २५-२६ वर्षांंच्या या माणसाला २२ वर्षाचा अनुभव कसा असू शकेल असा कोणालाही प्रश्न पडला नाही. ते आपल्या बैठकीत हिंदु देवदेवता, शिरडीचे साईबाबा, आणि मुस्लिम साधुसंतांची चित्रे ठेवीत.

या सुफी संताचा पर्दाफाश करायचं अंनिसच्या कार्यकत्र्यांनी ठरविलं. एका स्टिंग ऑपरेशनचं नियोजन करण्यात आलं. दोन कार्यकर्ते एका जोडप्याच्या रुपामधे सूफीबाबाकडे गेले आणि आपल्याला मूलबाळ नसल्याची तक्रार केली. शहाने त्या स्त्रीला एकट्याने तपासावे लागेल असे सांगितले. तपास करताणा त्याने तिची साडी सोडण्याचा प्रयत्न केला. परंतु दक्ष असलेली कार्यकर्ती काहीतरी कारण सांगून बाहेर आली. तिथल्या हजर असलेल्या कार्यकत्र्यांना आणि जमलेल्या लोकांना तिने झालेला सर्व प्रकार सांगितला. ते शहा यांना पुन्हा भेटले तेव्हा शहांनी पुत्र प्राप्तीसाठी काही कर्मकांडं करण्यास सांगितली आणि काही खèया-खोट्या गोष्टी सांगून श्रोत्यांवर छाप मारण्याचा प्रयत्न केला. ती कर्मकांडं पार पाडण्यासाठी तिने एकटीनेच यावे हे तो वारंवार सांगत होता. कार्यकत्र्यांची एक टीम, स्थानिक पोलीस आणि टीव्हीचे लोक त्याच्या खोलीत घुसले आणि त्याला समोर उभे ठाकले. आता सूफी बाबाचे पाय लटपटायला लागले. चौकशी सुरू होताच बाबांनी सर्व काही कबूल करून टाकलं. अंनिसचे दक्ष असलेले कार्यकर्ते, पोलीस आणि जागृत झालेली जनता या सर्वांच्या सहकार्याने आज बाबा आणि त्याचे हस्तक जेलमधे खटल्याच्या निकालाची वाट बघत बसले आहेत.

 क़ुंडलिनी बाबा:

 गोव्यातल्या मडगाव येथे असलेल्या एका आध्यात्मिक केंद्रामधे सिद्ध रामेशजी चौहान यांनी एक चार दिवसांचं शिबीर घेतलं. कुंडलिनी जागृत करणाèया या महान अतिथीचं गोवेकरांना केवढं अप्रूप होतं! कुंडलिनी जागृत झाली म्हणजे आरोग्य, मनःशान्ती आणि आध्यात्माचं ज्ञान मिळतं. या शिबिरासाठी जी पत्रकं वाटली गेली त्यामधे कुंडलिनीचे फायदे वर्णन केले होते, ‘या कुंडलिनी जागृतीमुळे मनातील सर्व वाईट विचार, मत्सर, वाईट सवई आपल्या आयुष्यातून नाहिशा होतील. शांभवी क्रियेने रोगनिवारण आणि अलौकिक शक्ती प्राप्त होतील. गणेशक्रियेने सर्व मंत्र-तंत्रांच्या प्रभावापासून सुटका होईल. आणि यापुढे त्यांचा त्रास होणार नाही. मूत्रपिंड, हृदय, कर्करोग, रक्तदाब, एडस,ट्यूमर इत्यादी विकारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींना तुरंत आराम पडेल. जास्त माहिती मिळविण्यासाठी फोन नंबरही पत्रकात दिला होता. कार्यक्रम पूर्णपणे विनाशुल्क होता परंतु त्यानंतर ‘कन्सलटेशनङ्कची गरज असल्यास प्रतिदिन ३००० रुपये खर्च येईल.

अंनिसच्या स्थानिक कार्यकत्र्यांनी त्यांच्या पहिल्यादिवशीच्या व्याख्यानाला हजेरी लावली. केन्द्राच्या प्रमुखांनी चौहान यांची ओळख करून दिली. चौहन मेकॅनिकल इंजिनिअर असून त्यांचे सहा कारखाने आहेत. करोडोपती असून सुद्धा सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेने ते गोवेकर श्रोत्यांचं जीवन सुखी व्हावं म्हनून हा कार्यक्रम राबविण्यास आले आहेत. वगैरे वगैरे. व्याख्यान आणि कुंडलिनीचे प्रात्यक्षिक दाखवून झाल्यावर अंनिसच्या कार्यकत्र्यांनी त्यांना कुंडलीनीविषयी प्रश्न विचारले.

‘‘आध्यात्मिक प्रवृत्तीचा माणूस सहसा स्वतःची स्तुती केलेली पसंत करीत नाही. आपण मात्र आपली इथे होत असलेली स्तुती ऐकून घेतली; त्यास आडकाठी केली नाही. असे का? उत्तराप्रीत्यर्थ बाबा काहीतरी पुटपुटले. ते कोणालाच ऐकू गेले नाही. एका कार्यकत्र्याने सुचविले की चौहानगुरुजींनी मूकबधीरांच्या शाळेत जावून त्यांच्यावर कुंडलिनी जागृतीचा इलाज करावा.

दुसरा प्रश्न होता, ‘गुरुजी आमचे लोक विठ्ठल, पांडुरंग, गणेश, मंगेश अशा अनेक देवदेवतांचे परम भक्त आहेत. आणि या देवतांच्या आशिर्वादाने सुखाने जगत आहेत. देवाचा आशिर्वाद असतांना या कुंडलिनीला जागृत करण्याची काय गरज? चौहान गुरुजी गप्पच राहिले.

‘‘गुरुजी ज्ञानेश्वरीमधे असं  म्हटलं आहे की कुंडलिनी जागृत झालेल्या माणसाला समुद्रापलिकडचेही दिसते. आपण आपल्या मागे असलेल्या पडद्याआड काय आहे ते सांगू शकाल का?  या प्रश्नाने गुरुजी रागावले, ‘‘तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला अलौकिक शक्ती प्राप्त नाहीत का? यावर गुरुजींचे चेले आरडा ओरडा करू लागले, ‘‘आम्हाला गुरुज़ींचं बोलणं ऐकायचं आहे; तुमचे फालतु प्रश्न आणि त्याची उत्तरं नाहीत. मग त्यांनी पत्रकार टीव्ही च्या कॅमेरामनवर हल्ला करायला सुरुवात केली. एकाने स्थानिक वृत्तपत्राच्या वार्ताहराचा कॅमेरा हिसकावून घेतला. मग पोलिसांनी मधे पडून दोन्ही पक्षांना शांत केले. आणि या गोंधळातच कार्यक्रम संपला.

ही असली शिबिरे, व्याख्याने, कार्यशाळा इत्यादी भोंगळ कार्यक्रम आयोजित करण्याचे सध्या खूळच माजले आहे. मोठमोठे दावे करून आणि विचित्र पद्धतीने सुख आणि मनःशांती मिळविण्याची आश्वासनं दिली जातात. ही सारी उपदेश आणि मार्गदर्शन करणारी केन्द्र म्हणजे सुशिक्षित/अशिक्षित लोकांना फसवून गल्ला जमा करण्याचा उद्योग असतात. आणि यांना आळा घालण्यासाठी आपल्याकडे काहीही उपाय उपलब्ध नाहीत.

 

कोल्हापूरचे निवृत्ती:

 कोल्हापूरचे निवृत्ती रामचंद्र चौगुले हे मध्यम वयाचे गृहस्थ स्वेच्छानिवृत्ती घेवून आता एक  कौटुंबिक मार्गदर्शन केन्द्र चालवीत आहेत. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मधल्या त्यांच्या गावाच्या आसपासच्या खेड्यांमधे ते एक दैवी शक्ती असलेले बाबा बनून रूहिले आहेत. जुनाट आजार बरे करण्यासाठी ते जादूटोणा आणि चेटुक यांचा अवलंब करतात अशी आसपास अफवा आहे. कोणत्याही कौटुंबिक समस्येवर ते आपल्या अलौकिक शक्तीने तोडगा काढू शकतात. त्यामुळे त्यांचा सल्ला घेण्यासाठी लोकांची गर्दी जमत असे आणि त्यांना लोक स्वतःच्या घरीही बोलावीत असत.

कोल्हापूरजवळच्या तामगाव नावाच्या खेड्यातल्या एका स्त्रीने त्यांना घराच्या वास्तुशांतीसाठी बोलावले. ही पूजा चालू असतांना निवृत्तीबुवांनी तिला नवीन घरात सुखशांती लाभावी म्हणून लैंगिक संबंध करण्यास सांगितले. ती स्त्री भांबावून गेली आणि तिने ही गोष्ट नातेवाईकांना सांगितली. ते अर्थातच संतापले आणि ही बातमी गावभर पसरली. संतप्त गावकरी जमा झाले आणि जे हाती लागेल ते घेवून निवृत्तीबुवांना झोडपू लागले. त्यांचे कपडे फाडले आणि त्यांना जोड्याचा हार घालून त्यांची धिंड जवळच्या पोलिस ठाण्यावर नेली.

पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलं  परंतु गावकरी त्यांना मारून टाकायलाच निघाले होते. त्यांच्या लंपटपणासाठी त्यांना मृत्यूदंडच  द्यायचा होता. या असल्या घटना काही विरळा नसतात. त्या खेड्यापाड्यातून वारंवार घडत असतात. परंतु या घटनांना सन्सनाटी बातमीचे मूल्य नसल्याने माध्यमं त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. घटना भयानक परिणाम घडविणाèया असल्या तरच त्यांच्याकडे वृत्तपत्रांचे लक्ष वेधते. कायदेही तुटपुंजे अस्ल्याने पोलीसही याबाबतीत योग्य ती कारवाई करू शकत नाहीत.

वरील सर्व घटनांमधून अस्तित्वात असलेले कायदे अशा घटनांना आळा घालण्यास किती असमर्थ आहेत हे स्पष्ट होते. देव आणि धर्म यांच्या नावाखाली चाललेला हा सर्व सावळागोंधळ ताबडतोब थांबवलाच पाहिजे. धार्मिक देवभक्तांनीसुद्धा विवेकवादींच्या ह्या असल्या घटनांना आळा घालण्याच्या मागणीस पाठीबा दिला पाहिजे. त्यासाठी जादूटोणा आणि तत्सम दुष्ट प्रथा आणि अघोरी उपाय यांना प्रतिबंध करणारा कायदा पास केला पाहिजे.

प्रभाकर नानावटी

(थॉट अँड अॅक्षन – जनेवारी-मार्च २००८)