२० वर्षातील प्रगती

अंनिसची १९८९ ते २०१० या काळातील वाटचाल: सुरुवातीस अंनिस बुवाबाजी भुते, भानामती, चेटुक इत्यादींविरुद्ध संघर्ष करीत होती. फुले-शाहु-अंबेडकर यांनी सुरू केलेल्या व्यापक सामाजिक सुधारणांच्या चळवळीला हा संघर्ष पोषक असला तरी त्या वेळेस त्याचं स्वरूप एका क्रियाशील आणि समर्पित तरूणांच्या गटासारख होतं. मागील २० वर्षांमधे मात्र ही चळवळ अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक विचारपद्धती, वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मचिकित्सा, इहवाद आणि बुद्धिप्रामाण्यवाद या सर्व आघाड्यांवर प्रगती करीत आता मानववादाच्या, विवेकनिष्ठ जीवन जगण्याच्या मकाणावर पोचण्याच्या प्रयत्नात आहे. मान्स आता एका धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी आणि  विवेकवादी व्यापक, सर्वसमावेशक समजसुधारणेच्या अभियानाचा मुख्य भाग झाली आहे. परंतु मान्स आणि कट्टर बुद्धिप्रामाण्यवादी यांच्या विचारसरणीमधे थोढासा फरक आहे. इतर बुद्धिप्रामाण्यवादींप्रमाणे मान्सला सुद्धा लोकांनी आपलं आचरण शुद्ध नैतिक राहावं म्हणून आपल्या सदसद्विवेकबुद्धीवरच भरवसा ठेवावा हे पटतं. परंतु जे नीतीमान आहेत पण आपल्या नैतिक आचरणासाठी ज्यांना ईश्वराचा किंवा धर्माचा आधार घ्यावासा वाटतो त्यांच्याशी नैतिकतेच्या मुद्यावर वाद घालण्याची अंनिसला गरज वाटत नाही. मान्सच्या मते माणूस आस्तिक आहे वा नास्तिक यापेक्षा तो नीतिमान आहे की नाही याला जास्त महत्त्व आहे. बहुतेक माणसांचा जन्म आणि पालनपोषण धार्मिक कुटुंबातच झालेलं असतं; जन्मापासूनच बुद्धिप्रामाण्यवादी कुटुंबात वाढणं अगदी अपवादात्मक असतं. त्यामुळे समाजपरिवर्तनाच्या चळवळीला या सामाजिक वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. अशा धार्मिक वातावरणात वाढलेल्या लोकांच्यात परिवर्तन घडवण्यासाठी शांतपणे, समजुतदारपणे आणि त्यांच्या आचार-विचार स्वातंत्र्याचा आदर करूनच त्यांच्या विवेक क्षमतेला चालना द्यावी लागते. शतकानुशतके धार्माने लोकांना अलौकिक शक्तींवर श्रद्धा ठेवण्यास आणि त्यांना शरण जाण्यास शिकविले आहे; धर्माज्ञांचं पालन करायला शिकविलं आहे; त्यांच्याविषयी शंका व्यक्त करणं, धर्ममार्तंडांच्या आज्ञा न पाळणं पाप आहे असं लोकांच्या मनावर ठसवलं आहे; विधात्याने आपल्या नशिबामधे जे लिहून ठेवले आहे ते मुकाट्याने भोगायला शिकवले आहे. ही खोल रुजलेली मानसिकता घालवून त्या जागी आपणच आपलं नशीब बनवायचं आहे असा आत्मविश्वास रुजवणं हे काही सोपं काम नाही. त्यासाठी परिवर्तनाच्या चळवळीला मोठ्या चिकाटीने आणि निश्चयाने दमदार पावलं टाकावी लागतात. उतावळेपणा करून चालत नाही. ईश्वर अस्तित्वातच नाही आणि आपल्या उद्धारासाठी, मुक्तीसाठी त्याची करुणा भाकत बसणं म्हणजे केवळ मूर्खपणा आहे असं सांगत सुटल्यास अंनिसच्या कार्यकत्र्यांना लोक दाराशीही उभं राहू देणार नाहीत. तळागाळात काम करणाèयांना हे परवडण्यासारखे नाही. तेव्हा परिवर्तन घडविण्यासाठी अंनिस विधायक कार्यक्रम आणि उपक्रम राबवून लोकशिक्षण करणे पसंत करते.

व्यापक परिवर्तनासाठी अंनिस अनेक मार्गांचा अवलंब करते. अंधश्रद्धानिर्मूलनासोबत लोकांना प्रबुद्ध करण्याचाही मार्ग अवलंबते. या शिक्षणामधे विशेषतः विज्ञान आणि सामान्य माणसाचं धार्मिक-आर्थिक-सामाजिक पिळणूक आणि शोषण कसं चालतं याबाबत माहिती देणं आणि त्यातून समाजाला जागृत करणं हा हेतु आहे. तसंच पर्यावरणाबाबतचे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य, एक जबाबदार नागरिक म्हणून पार पाडायचे कर्तव्य, धर्माची चिकित्सा करण्याचं आणि धर्माच्या नावाने होत असलेला अनाचार उघडकीस आणण्याचं, रोखण्याचं कर्तव्य, इतर धर्मांबाबत सहिष्णुता बाळगणं, तसंच वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवाद मनात रुजविणं या साऱ्या कर्तव्यांबाबत लोकांच्यामधे जागृती आणि कर्तव्यभावना निर्माण करण्यासाठी अंनिस अनेकविध उपक्रम राबवते. हे उद्देश साध्य करण्यासाठी वाढत्या वयातील मुलांपासूनच सुरुवात करायला हवी. म्हणून अंनिस शाळकरी मुलांसाठी तसेच कॉलेजमधे जाणाऱ्या नव युवकांसाठी व त्यांच्या शिक्षकांसाठी अनेक उपक्रम राबवते. अंनिसने शोषण करणाऱ्या अनेक धार्मिक आणि सामाजिक प्रथांविरुद्ध लढे दिले आहेत. आणि बाबा-बुवा-माता-देवींचे बुरखे फाडलेले आहेत आणि त्यासाठी अंनिसच्या अध्यक्षांना अनेक ठिकाणच्या न्यायालयामधे आरोपांना उत्तरे द्यावी लागली आहेत. अंनिस केवळ अंधश्रद्धानिर्मूलन आणि बाबाबुवांचा पर्दाफाश एवढंच करून थांबत नाही तर ती सध्याच्या अंधश्रद्धांना खतपाणी घालणाèया आणि बाबा-बुवांचे प्रस्थ माजवणाऱ्या समाजव्यवस्थेलाच आव्हान देणारी चळवळ आहे. भूक, दारिद्य्र, अज्ञान, धर्म, ईश्वर आणि रोगराई अशी अंधश्रद्धेची अनेक मुळे आहेत. या सर्वांशी मुकाबला करण्यासाठी अंनिस इतर समविचारी संघटनांशी या बाबतीत सहकार्य करते. त्यांच्याशी सहयोग करून अंनिस समाजातील भ्रष्टाचार, आरोग्य-शिक्षण-पोषक आहार यापासून गरिबांची वंचना, तसेच अन्याय, सामान्य जनतेप्रत शासनकत्र्यांची संवेदनशून्यता आणि औदासिन्य या समस्यांबाबत संघर्ष करते.

एवढे पुरेसे नाही. अंनिसला आणखी चरेच काही करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशामधे नानातèहेच्या अगणित अंधश्रद्धा आहेत. त्यांचा शोध घेवून अभ्यास करायला हवा. कार्यकत्र्यांना वेगवेगळी साधनं वापरण्याचं शिक्षण द्यायला हवं. अनेक वेळा उद्भवणाऱ्या  पेचप्रसंगांना सामोरं कसं जायचं  ह्याचं प्रशिक्षण द्यायला हवं. कार्यकत्र्यांची एक नवी फौजच निर्माण करायला हवी. त्यांना राजकारण, अर्थकारण, शिक्षण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नैतिकतेचं-शुद्ध आचरणाचं महत्त्व यांचं प्रशिक्षण द्यायला हवं. आणि हे सर्व सैद्धांतिक नव्हे तर व्यावहारिक वर्तनाच्या पातळीवर अमलात आणायला हवं.

बट्र्रांड रसेल यांनी म्हटले आहे, ‘युद्ध, धर्म आणि राष्ट्रवाद ही तीन आपल्या जीवनातील मोठी अरिष्टे आहेत.ङ्क रसेल यांच्या या त्रिकुटामधे आपल्याला स्थान-भाषा-जात इत्यादी अभिनिवेषांचा अंतर्भाव करायला हवा. ह्या सर्व दुष्ट शक्तींशी लढत लढतच अंनिससारख्या संघाटनांना लोकांना अंधश्रद्धेतून मुक्त करून बुद्धिप्रामाण्यवादी आणि अखेरीस मानववादी बनवायचं आहे. ‘विश्वचि माझे घर ह्या उदात्त उद्दिष्टापर्यंत पोचायचे आहे; या वौश्विक घराचा अवास्तव फायदा घेण्यासाठी नव्हे तर ह्या विश्वात अस्तित्वात असलेल्या आणि घडत असलेल्या सर्व गोष्टींबाबतची माझी जबाबदारी पार पाडण्यासाठी. पुन्हा एकदा रसेल यांचे मत पाहू. ते म्हणतात, ‘ज्या जीवनाची प्रेरणा प्रेम असते आणि मार्गदर्शक ज्ञान असते आणि ज्या जीवनात प्रत्येक पिढीला ती नंतर येणाऱ्या पिढ्यांसाठी मानवाने हजारो वर्षांच्या अनुभवातून साठवलेला बौद्धिक आणि नैतिक वारसा जतन करणारी विश्वस्त असल्याची जाणीव स्पष्ट दिसते ते जीवन म्हणजे चांगले जीवन.

अखेरीस एम एन रॉय यांच्या ङ्कद ह्रिदम ऑफ कॉसमॉस (वैश्विक लयबद्धता) या पुस्तिकेतलं हे वचन पाहूया. ‘शतकानुशतके मान्यता पावलेल्या आध्यात्मिक बंधनातून, आधुनिक विज्ञानाने सुटका केल्यानंतर माणसाला आता आत्मस्वरूप पुन्हा ओळखणं शक्य झालं आहे. हे स्वरूप म्हणजे विश्वास ठेवणं नव्हे तर प्रश्न विचारणं, शोधणं आणि तपासणं हे आहे. जैविक उत्क्रांतीतून सिद्ध झालेली माणसाची तर्कशक्ती (रॅशनॅलिटी) खोल, खोल जात निसर्गातील गुपितं उलगडत सत्य शोधून काढायला माणसाला सक्षम करते. स्वेच्छेने स्वीकारलेल्या नैतिकतेचाही पाया ही तर्कशक्तीच आहे. तर्कक्षमता म्हणजे काही आध्यात्मिक प्रकार नव्हे. तर्क म्हणजे निसर्गातील सुसंगतीची जाणीव आहे आणि त्यामुळे तर्काला अनुभवजन्य वास्तवता असते. तर्क करणं, विचार करणं हे एक जैविक कार्य आहे आणि वैश्विक लयबद्धतेचा सूक्ष्म प्रतिध्वनी आहे.